अक्षय कोठावदे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लाडशाखीय वाणी समाजाचे तब्बल ३० विद्यार्थी गेल्या दोन वर्षांमध्ये चार्टर्ड अकांउंट (सीए) बनले आहेत. गेल्या वर्षी १७ आणि या वर्षी १३ विद्यार्थ्यांनी खणखणीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा अतिशय खडतर समजली जाते. त्यामुळे या परिक्षेत देदिप्यमान यश मिळवून या सर्व युवक-युवतींना सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा कल सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) बनण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कसोशीने या परीक्षेची तयारी करीत आहेत. गेल्या दोन वर्षांतील विद्यार्थ्यांच्या यशाने समाजातील अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समाजाच्यावतीने विशेष कौतुक होत आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑगस्ट महिन्यात लाडशाखीय वाणी समाज सीए संघटनेच्यावतीने सत्कार व गुणगौरव समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
यंदा (२०२२) सीए परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी असे
१) शिवम कमलाकर बागड, सटाणा.
२) धनश्री राजेंद्र कोठावदे डोंबिवली.
३) केतन प्रल्हाद पितृभक्त, धुळे.
४) आरती उद्धव अमृतकर नाशिक.
५) मंजिरी सतीश वाणी, नाशिक.
६) धीरज खैरनार, नाशिक.
७) शुभम बापूसाहेब तिसे,धुळे.
८) निकिता भिकन सोनजे, धुळे.
९) अथर्व विकास सोनगिरे, नाशिक.
१०) सायली संजीव मालपुरे, नाशिक.
११) ऋतुजा मिलिंद अमृतकर ,नाशिक.
१२) सिद्धी दिगंबर शिनकर, नाशिक
१३) कु. किशोरी चंद्रकांत अमृतकार, पनवेल
गेल्यावर्षी (२०२१) मध्ये सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असे
१) चि.सर्वेश संजय ततार, नासिक
२) कु. अनुष्का विकास चिंचोले, नासिक
३) कु.पुजा अशोक राहुडे, नासिक
४)चि. प्रसाद सुनील येवला, नासिक
५) चि. शुभम संजय ब्राम्हणकर, नासिक
६) चि.अनुज प्रवीण देव, चाळीसगाव
७) चि.श्रेयस सुरेश सोंजे, चाळीसगाव
८) कु .योगिनी संजय येवले, चाळीसगांव
९) चि.आकाश भालचंद्र सोनजे, ठाणे
१०)चि.अमोद संजय वाणी, उल्हासनगर
११)चि.प्रणव राजेंद्र अमृतकार, औरंगाबाद
१२)कु स्नेहा संतोष येवले पुणे
१३)कु आरती सुधीर सोनगिरे नाशिक
१४) चि श्रेयस भगवान कोठावदे नासिक
१५) चि अंकित राजेंद्र सोनगीरे, धुळे.
१६)कु मानसी संजय येवले, कासोदा
१७)कु साक्षी उद्धव मालपुरे नासिक.
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिक दृष्टिकोन बघता वाणिज्य क्षेत्रात मुख्यतः सीए क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कल दिवसेंदिवस वाढत आहे. सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाणी समाजात देखील दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला कमी वेळेत यश संपादन करता येईल. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– अनिल कोठावदे, सीए, नाशिक
मेहनतीचे चांगले फळ नक्कीच मिळते. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि सभोवतालच्या प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटल्याबद्दल सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या अभ्यासाप्रती सातत्यपूर्ण समर्पण आणि वचनबद्धता हे तुमच्यासाठी एक बक्षीस आहे.
– विशाल वाणी, सीए आणि व्यवस्थापकीय समिती सदस्य, ICAI नाशिक शाखा
Ladshakhiy Wani Samaj 29 Students Passed CA Exam in last 2 Years