इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याची महिला वाट बघत होते. त्यानंतर आता त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
ज्या पात्र महिला आहे त्यांना हा सन्मान निधी मिळाला का यासाठी ते त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॅाल करुन बँकेत जमा झालेली रक्कम विचारु शकता. बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सुध्दा मेसेज येईल. प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही पैसे आले की नाही ते पाहू शकतात.