मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास १ कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत अधिकाधिक माता-भगिनी पर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.