इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जून महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. याची प्रक्रिया सुरु झाली असून सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस प्राप्त होईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या की, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून एप्रिलचा सन्मान निधी केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. आता जुनचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. ज्या पात्र महिला आहे त्यांना हा सन्मान निधी मिळाला का यासाठी ते त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॅाल करुन बँकेत जमा झालेली रक्कम विचारु शकता. बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सुध्दा मेसेज येईल. प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही पैसे आले की नाही ते पाहू शकतात.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असे आदिती तटकरे यांनी सांगितले.