इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी गावात लाडक्या बहिण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीने डल्ला मारत हे पैसे दारुसाठी खर्च केल्याचा प्रकार समोर आला. हे पैसे दारुवर खर्च केल्यानंतर महिलेने पतीला जाब विचारला. त्यानंतर तिच्या दारुड्या पतीने आणि सासूने थेट कोयत्याने तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या योजनेतून मिळणारे दरमहा १५०० रुपये घरखर्चासाठी जपून वापरावे असे नियोजन पत्नीने केले होते. मात्र पतीला दारुचे व्यसन असल्यामुळे तो हे पैसे परस्पर काढून घ्यायचा व सगळे पैसे दारुवर खर्च करायचा. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली आहे. तीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
लाडक्या बहिणेच्या पैशांमुळे कुटुंबात कलह झाल्याची ही पहिली घटना नाही. या पैशांमुळे अनेक कुटुंबात वादही झाले. पण, ते पोलिस स्टेशनपर्यंत पोहचले नाही. पण, लोणी गावातील घटनेत पोलिस तक्रार झाली आहे.