इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
आतापर्यंत या योजनेतून ७ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. त्यानंतर हे दोन हप्ते आता मिळणार आहे. या सन्माननिधीमध्ये वाढ करण्याचे आश्वासन निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.