इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे.
यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होईल. येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करुन देणार आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या येत्या आठ मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार आहे. खास महिला लोकप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजना ही बंद होणार नसल्याची माहिती काल दिली होती. त्यामुळे ही योजना सुरुच राहणार आहे. यात अर्थसंकल्पानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.