शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिला आत्मनिर्भरतेचा नवा पॅटर्न… ३ हजार महिला या ३० लाख रुपये निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार

by India Darpan
फेब्रुवारी 20, 2025 | 7:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महिला व बाल विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे. नागपूर मधील ३ हजार महिलांनी एकत्र येऊन ३० लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ या महिलांना उद्योग सुरू करण्यास मदत करणार असून, यासाठी शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली आहे.

डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूर मधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे. 3 हजार महिला या 30 लाख रुपये निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत. तसेच दुसऱ्या महिलांनाही या पैशातून छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देत आहेत. एखादी दुर्घटना घडली तर मदत करत आहेत. भांडवलावर मिळणा-या व्याजावर ही सोसायटी पुढे कार्यरत राहणार आहे. अशा पद्धतीने ज्या महिला पुढे येतील त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग “सपोर्ट सिस्टिम” देखील उभी करणार आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे डॉ.अनुपकुमार यादव यांना सांगितले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत
महिला काटकसर करून आपल्या घरच्या गरजा पूर्ण करत असते. किराणा सामान भरणे मुलांची फी किंवा औषधे यांच्यावरच पैसे खर्च होत असतात. या योजनेतील लाभार्थी ग्रामीण क्षेत्रातील जास्त प्रमाणावर आहेत. किराणा सामान तसेच इतर छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे खरेदी होत असल्याने गावातल्या छोट्या व्यापा-यांना देखील याचा अपरोक्ष लाभ होतो. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) सुमारे १.५ लाख व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानामार्फत सुमारे ६ लाख याप्रमाणे सुमारे ७.५ लाख महिला बचत गट ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित येऊन निधी उभा करुन महिलांना विविध उद्यमशील उपक्रम राबविण्यास सदर योजनेमूळे शक्य होत आहे. या सर्व बाबींमुळे ग्रामीण भागामध्ये निधीचा इनफ्लो वाढणार असून ग्रामीण भागामध्ये सर्क्यूलर अर्थव्यवस्थेस चालना मिळून ती बळकट होईल. त्यामुळे ग्रामीण भागामध्येच गरजांची पूर्तता होणार असल्याने शहराकडे होणारे स्थंलातरण थांबण्यास मदत होईल असे डॉ.अनुपकुमार यादव यांनी सांगितले आहे.

गरजवंताना सहाय्य
राज्यातील ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागामधील, त्याचप्रमाणे शहरातील (गरीब महिलांना) झोपडपट्टी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळत आहे. अशा प्रकारे समाजातील गरजू महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेमूळे त्यांची आर्थिक उन्नती होऊन त्या आर्थिकद्ष्टया सक्षम होतील.

महिला सदर योजनेच्या अटी शर्तीनसुार काही लाभार्थी अपात्र असल्याने त्या स्वत:हून लाभ परत करत आहेत. अशा प्रकारे या योजनेकरिता अपात्र असलेल्या इतर लाभार्थी महिलांना स्वत:हून लाभ परत करावयाचा असल्यास अथवा यापुढे त्यांना लाभ नको असल्यास त्याबाबत सूविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवजयंतीदिनी राजधानीत दुमदुमला जयघोष !

Next Post

मुंबईच्या CSMI विमानतळावर १०.२२ कोटी रुपये किमतीचे कोकेन/मेथाक्वालोन जप्त…एका प्रवाशाला अटक

Next Post
jail1

मुंबईच्या CSMI विमानतळावर १०.२२ कोटी रुपये किमतीचे कोकेन/मेथाक्वालोन जप्त…एका प्रवाशाला अटक

ताज्या बातम्या

fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

जून 20, 2025
Untitled 63

वारसदार म्हणवणारे आज सत्तेसाठी लाचार…एकनाथ शिंदे

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011