इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणा-या अनेक महिला आता पैसे परत करु लागल्या आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने हेड तयार केला आहे. त्यामुळे आता नियमात न बसणा-या पण, योजनेचा फायदा घेणा-या महिलांवर संक्रात आली आहे. अपात्र असतांनाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते या भीतीने या महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्या आहे.
अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला २ लाख ३० हजार, ६५ वर्षे पेक्षा जास्त असलेल्या महिला १ लाख १० हजार, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वच्छेने योजनेतून नाव मागे घेणा-या महिला १ लाख ६० हजार, एकुण अपात्र ५ लाख महिला आहे.