मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे.
आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३००० रुपये लाभ जमा झाल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.