मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून हा सहावा हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर हा हप्ता मिळेल असे सांगितले होते. त्यानुसार आता हा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
याअगोदर १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये अगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आता पुन्हा १५०० रुपये डिसेंबरच्या हप्त्याचे येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ही रक्कम २१०० रुपये कऱण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण, ते तूर्त आता दिले जाणार नाही. अर्थसंकल्पानंतर ही रक्कम वाढणार आहे.