इंडिया दर्पण ऑनलााईन डेस्क
लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपने आदेश दिले. काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. त्यानतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ शेअर करत टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त १५०० रुपये?लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली!सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे.