नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोंबरमध्येच मिळत आहे. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे हे पैसे देण्यात येतत आहे. त्यामुळे या महिन्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत या योजनेतून महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यातून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले. आता त्यात ३००० रुपयाची भर पडणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची ही रक्कम ७५०० रुपये होणार आहे. आज सुरुवात झाली असून येत्या १० ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे सर्वांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेत जूलै पासून पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे अगोदरच जमा झाले आहे. आता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे जमा होत आहे.
ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे. अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे बाकी आहे त्या महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.