मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहिणीचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस ३२ लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत.