इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी नवीन योजना सरकारने आणल्या नाही. निवडणुकीपूर्वी दरमाह २१०० देण्याचे वचन महायुतीने दिले होते, त्याबाबत सुद्धा घोषणा आजच्या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नसल्याचे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार जसे निवडणुकीनंतर आपले गुलाबी जॅकेट विसरले, तसेच आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा विसरले.