इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या की, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून एप्रिलचा सन्मान निधी केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. आता एप्रिलचा हा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे.
ज्या पात्र महिला आहे त्यांना हा सन्मान निधी मिळाला का यासाठी ते त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॅाल करुन बँकेत जमा झालेली रक्कम विचारु शकता. बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सुध्दा मेसेज येईल. प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्ही पैसे आले की नाही ते पाहू शकतात.