मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते मिळू शकणार आहे. या योजनेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जही स्वाकारणे आता बंद झाले आहे. आतापर्यंत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना या योजनेतून पाच महिल्याचे हप्ते प्राप्त झाले. याअगोदर सरकारने तीन महिन्यांच्या हप्त्यानंतर ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले आहे. पण, आता निवडणूक घोषित झाल्यामुळे डिसेंबर महिन्यातील हप्तासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणा-या योजना त्वरीत थांबवल्या पहिजेत अशा सूचना मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आर्थिक लाभ देणा-या योजनांचा आढावाही घेण्यात आला होता. त्यानंतर महिला बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे या विभागाकडून या योजनेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर या विभागाने निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला दिली आहे.