मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत रात्री बारापर्यंत आता अर्ज करता येणार आहे. पण, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी सरकारने तिस-यांदा मुदतवाढ दिली आहे. याअगोदर १ जुलै ते १५ जुलै पर्यंत मुदत दिली होती. ती वाढवून ३१ ऑगस्ट केली. त्यानंतर ३० सप्टेंबर केली आता तिस-यांदा मुदत वाढवत ती १५ ऑक्टोंबर केली आहे.
आतापर्यंत ७५०० रुपये जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नुकतेच ३००० रुपये बँक खात्यावर जमा झाले आहे. यावेळेस नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोंबरमध्येच देण्यात आले. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे हे पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र मिळाले. आतापर्यंत या योजनेतून महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यातून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले. आता त्यात ३००० रुपयाची भर पडत्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची ही रक्कम ७५०० रुपये झाली आहे. या योजनेत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे अगोदरच जमा झाले. त्यानंतर ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे जमा झाले.
केवायसी करा
ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे. अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे बाकी आहे त्या महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.