शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथे लॅक्रॉस या खेळासाठी जिल्हा निवड चाचणीचे या तारखेला आयोजन…ऑलिंपिकमध्ये खेळाचा समावेश

by India Darpan
एप्रिल 5, 2025 | 7:20 am
in राष्ट्रीय
0
IMG 20250404 WA0061

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जागतिक ऑलिंपिक संघटनेने लॅक्रॉस या खेळाचा समावेश २०२८ मध्ये लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्स येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत केला आहे. यामुळे हा खेळ खेळण्यासाठी अनेक खेळाडू इच्छुक झाले आहेत. या खेळाडुंना या खेळाची सखोल माहिती मिळावी यासाठी नाशिक येथे गेल्या पाच – सहा महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत.

या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, खेळाडूना योग्य संधी मिळावी यासाठी लॅक्रॉस असोसिएशन ऑफ नाशिक या संघटनेमार्फत १० एप्रिल २०२५ रोजी स्व. मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, नाशिक येथे सबज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गटाच्या मुला / मुलींची नाशिक जिल्हा संघासाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. सब ज्युनियर गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख ३० एप्रिल, २००८, ज्युनियर गटासाठी ३० एप्रिल, २००६ किंवा त्यानंतरची असावी.
या निवड चाचणीतून निवड झालेले खेळाडू पुणे येथे १४ आणि १५ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

मागील वर्षी डिसेंबर,२०२४ मध्ये सेलू , परभणी येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ गट पुरुषाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याबद्दल नाशिक पूर्वचे आमदार ॲड.राहुल ढिकले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले होते. यावेळी देखील नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व कायम राहावे याकरिता खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यांना सराव करण्यासाठी मैदान आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. संघटनेने नुकतेच या खेळाचे साहित्य खरेदी केले असून खेळाडूंना ते मोफत वापरण्यात दिले जात आहे.

या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, सरचिटणीस दीपक निकम-पाटील, खजिनदार ज्योती निकम, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अविनाश वाघ मो. क्र. ७०३०७९६९७६, शैलेश् रकीबे ७३९७९७७१७३, शशी भूषणसिंग मो. ८६००२००५५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरगुती गॅसचा वाहनांसाठी राजरोस वापर…गुन्हे शाखेच्या पथकाने उदध्वस्त केले दोन अड्डे, दीड लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

Next Post

सीबीआयने इंटरपोल चॅनेल्सद्वारे वॉन्टेड गुन्हेगारला युएईहून भारतात आणले….राजस्थानच्या विविध गुन्हयात आरोपी

Next Post
cbi

सीबीआयने इंटरपोल चॅनेल्सद्वारे वॉन्टेड गुन्हेगारला युएईहून भारतात आणले....राजस्थानच्या विविध गुन्हयात आरोपी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011