विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
एखाद्या मुला किंवा मुलीमध्ये गुणवत्ता असेल तर ते अनंत अडचणीवर मात करीत आणि अडथळे पार करत सातासमुद्रापार देखील शिक्षणासाठी जाऊ शकतात, असे म्हणतात. ही अशीच गोष्ट एका जिद्दी मुलीची असून सीमा कुमारी असे तीचे नाव आहे.
भारतातील गरीब कुटुंबातील मुलींना क्वचितच चांगला अभ्यास करण्याची आणि करिअर करण्याची संधी मिळते. त्यांचे पालक मात्र मुलीचे लवकर लग्न केले पाहिजे या चिंतेने काळजी करतात. परंतु बिहारमधील रांची नजिकच्या दाहो गावची सीमा कुमारीची खरी गोष्ट ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल.
कारण सीमा कुमारी हीचे वडिल मजूरी करतात, तर आई हातगाड्यावर लाकडी वस्तूची विक्री करते. गरीबीतून शिक्षण घेत सिमाने स्वत: हून हे स्थान गाठले. दाहो गावची १७ वर्षीय मुलगी सीमा कुमारी बारावी पास झाली असून लवकरच अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात जाणार आहे. ४ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी याची निवड केली गेली आहे, तिला ६१ लाखांची पूर्ण शिष्यवृत्ती देण्यात येईल.
मजूरी करणार्या आई – वडिलांची मुलगी सीमा म्हणाली, मी आमच्या खेड्यातील सरकारी शाळेत शिकत असे. २०१२ मध्ये एक दिवस जनावरांना चारा (गवत) घेण्यासाठी जात होते, जेव्हा मी खेड्यातील बर्याच मुलींना फुटबॉल खेळताना पाहिले तेव्हा मलासुद्धा खेळायचे वाटत होते.
मग कुटूंबाच्या परवानगीने तेथे मैदानात जाऊ लागले. हे सर्व जण एका स्वयंसेवी संस्थेच्या खास युवा शिबिराचा भाग असल्याचे समजले. मग मी तिच्यात सामील झालो आणि सतत खेळायला लागलो. तिथे इंग्रजी शिकले आणि त्यानंतर नवीन मुलींना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. आता माझी परदेशात शिक्षणाकरिता निवड झाली आहे, असे सीमा सांगते.