नाशिक – मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथे मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतने केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येकाने हा ठराव मागे घेतला गेला. परंतु हे लोण ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहे. सध्या कांदे लागवडीची घाई असल्याने मजुर मिळत नाही. म्हणून स्थानिक मजुरांना इतर गावात मजुरीसाठी जाण्यास बंदी घालण्याचे प्रकार नाशिक जिल्ह्यात वाढत चालले आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील महिला मजूर शेजारच्या गावी मजुरीसाठी वाहनातून जात होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी या मजूरांना व वाहनचालकाला गंभीर मारहाण केली. पिडीत महिलांनी याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याप्रकरणी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे म्हणाले की, मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये तो गुन्हा आहे. तळवाडे ग्रामपंचायतने असा ठराव मागे घेतला तरी अनेक गावांत असे प्रकार चालत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, असे चांदगुडे यांनी म्हटले आहे.