नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक भारतीयाच्या मनावर बालपणापासूनच मेरे देश की धरती सोना उगले हे गाणे कोरले गेले आहे. गाण्यातील उगले हिरे –मोती ही पुढची ओळही आतासार्थ ठरविली जाणार आहे. आर्टिफिशीअल अर्थात कृत्रिम मोती पूर्वीच तयार केले जातात. आता कृत्रिम हिरे निर्मितीही केली जाणार आहे. यंदाच्या केद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे.
खाणीत हिरे सापडतात हे आपण ऐकून होतो. पण आता चक्क प्रयोगशाळेत कृत्रीम मानवनिर्मित हिरे बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी आयआयटीला अनुदान देणार असल्याची घोषणा करण्या आली आहे. प्रयोगशाळेत बनविण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या बाजारात सध्या तेजी असल्यामुळे या क्षेत्राची वाढ करण्यासाठी हे अनुदान देण्यात आलेले आहे. सर्वात आधी २००४ साली प्रयोगशाळेत हिरा बनविला गेला होता. भारताला आता या क्षेत्रात अधिक पुढे जायचे आहे. एलाईड मार्केट रिसर्चच्या अहवालात २०३० पर्यंत हिऱ्यांचे हे मार्केट चार लाख कोटींचे झालेले असेल, असाही अंदाज वर्तिविण्यात येत आहे.
हिरे व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण
हिरे बनविणाऱ्या प्रयोगशाळांना तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे, त्यासाठीच आयआयटीला अनुदान दिल्याचे सांगितले जात आहे. आयआयटीशिवाय दुसरी कोणतीही संस्था हे काम करु शकत नाही. प्रयोगशाळेत लागणाऱ्या उपकरणावरील आयात कर कमी करावा किंवा तो शून्यावर आणावा, अशी मागणी हिरे व्यापाऱ्यांनी अर्थमंत्री सीतारमण यांना केली होती. त्यामुळे आता जर आयआयटीच अशी उपकरणे आणि स्वदेशी प्रयोगशाळा बनवत असेल तर परदेशातून उपकरणे आयात करण्याची गरज भासणार नाही.
कृत्रिम हिरे कसे बनवतात?
जमिनीखाली कार्बनचे अनेक अणू एकत्र येऊन त्यांच्यावर उच्च तापमान आणि दाब पडतो, तेव्हा त्यातून हिरा बनतो. आता प्रयोगशाळेत ही प्रक्रिया रासायनिक स्वरुपात निर्माण केली जाणार आहे. खाणीतून हिरे काढण्यासाठी वेळेची खूप हानी होते. खाण खोदण्यासाठी झाडांची कत्तल करावी लागते, शेकडो मजुरांची कामाला जुंपावे लागते. त्यानंतरही हिरे सापडतील, याची काही शाश्वती नसते. अशावेळी प्रयोगशाळेत जर यशस्वीरित्या हिऱ्यांचे उत्पादन केले, तर या क्षेत्राला मोठी उभारी मिळेल.
https://twitter.com/nsitharamanoffc/status/1620733809930174464?s=20&t=FCPJQZIzngGBS1DzbmKm8g
Lab Grown Diamond Union Budget Announcement
Finance Minister Nirmala Sitaraman