नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयाच्या 12 वीत असलेल्या शाश्रुती नाकाडे हिने राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेमध्ये तब्बल चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. शाश्रुतीच्या या यशाबद्दल प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत, उप प्राचार्या अंजु कृष्णानी व सर्व शिक्षकांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.
राजस्थान मधील उदयपुर येथे दिनांक 24 ते 27 मार्च दरम्यान आयोजित 21 व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेत शाश्रुती हिने बटरफ्लाय स्ट्रोक, 50 मीटर फ्री स्टाईल , 100 मीटर फ्री स्टाईल आणि 4 ×100 मीटर फ्री स्टाईल रिले या चारही प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई करून सर्वांना चकीत केले आहे. आजपर्यंत शाश्रुतीने विवीध स्पर्धांमध्ये 13 सुवर्ण पदक तसेच अनेक रौप्य व कांस्य पदकांची कमाई केलेली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.