नाशिक रोड – येथील तोफखाना केंद्रीय विद्यालयाची १२ वीची विद्यार्थीनी शाश्रुती नाकाडे हिची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. भारताच्या पॅरागेम्स समितीच्या वतीने बहारीन मधील मनामाड येथे २ डिसेंबर ते ६ डिसेंबर आशियाई युवा पॅरागेम्स स्पर्धा होत आहेत. त्यात पॅरा स्वीमिंग इव्हेंटमध्ये शाश्रुती ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रचंड प्रतिभावान जलतरणपटू ऍथलीटच्या शिरपेचातील हे आणखी एक पंख असेल. शाश्रुतीच्या या शानदार यशाबद्दल तोफखाना केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शाळेचे नाव कमावल्याबद्दल तिचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्या अंजू कृष्णाणी, उज्ज्वला चांदोरकर, शोभा पाटील, कल्पना सपकाळे, वीणा गौडर ,संजीवनी गावित, तुषार वारडे आणि रोहित गौड आदी शिक्षकांची उपस्थिती होती. शाश्रुतीचे वडिल विनायक नाकाडे हे मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विभाग येथे प्रशासकीय अधिकार आहेत. ती २०१३ पासून स्वीमिंग करते. बटरफ्लाय, फ्रीस्टाइल आणि बॅकस्कूब या स्विमींग प्रकारात चांगली गती आहे.