शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट….

by India Darpan
मार्च 17, 2025 | 8:07 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250316 WA0305 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारक परिसराची पाहणी करून त्याच्या विकासासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला. संगीत व कला क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हे केंद्र आणखी सक्षम व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना अधिक संधी मिळावी, त्यांच्या सादरीकरणासाठी या वास्तूचा अधिक उपयोग व्हावा, यासाठी पावले उचलली जातील,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याशिवाय, कुसुमाग्रज स्मारकात भविष्यात मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या व्यवस्थापनात असलेल्या काही अडचणी, विद्यापीठाशी संबंधित प्रश्न आणि त्यावर उपाययोजना याविषयीही त्यांनी संवाद साधला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या वास्तूचा आणि तिच्या कार्याचा अधिक विस्तार कसा करता येईल, यावरही त्यांनी भर दिला. “विधान परिषद आणि आमदारांच्या माध्यमातून मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतनासाठी आणि स्मारकाच्या विकासासाठी अधिक योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करत असताना कुसुमाग्रज यांच्या कार्यातून नेहमी प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “ही वास्तू महाराष्ट्र आणि भारताच्या गौरवाचे प्रतीक आहे. याची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी विविध पातळीवर सहकार्य मिळवण्याचा मी प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

Next Post

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू…दोन सख्या भावांचा समावेश

Next Post
dam12

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू…दोन सख्या भावांचा समावेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011