नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शांतिनिकेतन (हाऊस ऑफ पीस) २०२४ हा चित्रपट गुरुवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल जवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
शांती निकेतन (हाऊस ऑफ पीस) २०२४ हा चित्रपट एका माणसाबद्दल आहे जो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतो. नुकत्याच झालेल्या दहाव्या अजंठा-वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (२०२५) मध्ये या चित्रपटाला, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेता आणि ज्युरींचे कौतुक अशी तीन पारितोषिके मिळाली आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपंकर प्रकाश आणि उत्तम अभिनेत्री अवॉर्ड मिळवणारी नंदा यादव हे उपस्थित राहणार असून ते चित्रपटानंतर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी प्रवीण मानकर त्यांची मुलाखत घेणार आहेत.
चित्रपटास सर्वांना मुक्त प्रवेश असून जास्तीत जास्त रसिकांनी सिनेमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी – श्री प्रवीण मानकर यांनी केलेले आहे.