इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने कामराविरुद्ध तपास सुरू ठेवावा मात्र याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याच्यावर अटकेची कारवाई करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसंच, चेन्नई इथे जाऊन त्याचा जबाब नोंदवावा असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
हे आहे प्रकरण
विडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले होते. त्यांनी मुंबईतील हॅाटेलमध्ये जाऊन कामगाराच्या शोच्या सेटची तोडफोड करुन त्यांनी नासधूसही केली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर सोशल मीडियात कुणालचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात म्हटले की, कुनाल कामरा एक जानेमाने लेखक और स्टँडप कॉमेडियन है…कुणालने महाराष्ट्रकी राजनीती पर एक व्यंगात्मक गाना लिखा तो शिंदे गैंग को मिरची लगी. उनके लोगोने कामराका स्टूडियो तोड दिया. देवेंद्रजी, आप कमजोर गृहमंत्री हो!
या गाण्यावर प्रतिक्रिया देतांना माजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले की, कामराने जे केलं, ते व्यंग नाही. हा गंभीर आरोप आहे. तुम्ही आमच्या नेत्याला म्हणता गद्दार आहात. शिवसेनेत काय होतं हे माहित आहे का, गद्दारीचा अर्थ तुम्हाला माहित आहे का, २०२२ मध्ये शिंदेच्या नेतृत्वात ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली. ती गद्दीर नव्हती शिवसेनेला करेक्ट डायरेक्शनला आणण्याचा तो प्रयत्न होता असे निरुपम म्हणाले होते.