इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक व त्र्यंबकेश्वर २०२७-२०२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. या कुंभमेळ्याच्या तयारीचा आणि आयोजनाचा सर्वकष आढावा घेण्यासाठी, तसेच महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती गठीत करण्यात आली असून त्यात ७ मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. या समितीमुळे विविध स्तरांवरील कामकाजात सुसूत्रता येईल आणि निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे. या समितीत कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख म्हणून गिरीश महाजन असणार आहे. तर सहा मंत्र्यांमध्ये सदस्य म्हणून छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, उदय सामंत, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंह भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत भाजपचे ३, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी दोन सदस्य आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावशाली अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, २०२५ च्या कलम ३ अन्वये खालीलप्रमाणे कुंभमेळा मंत्री समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहोल.
कुंभमेळा मंत्री समिती –
१)गिरीश महाजन – कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख
२) श्री. छगन भुजबळ – सदस्य
२) दादा भुसे- सदस्य
४) उदय सामंत- सदस्य
५) जयकुमार रावल- सदस्य
६) शिवेंद्रसिह भोसले- सदस्य
७) अॅड. माणिकराव कोकाटे – सदस्य
