सिंहस्थ कामांचा शुभारंभ…
या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज रोजी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत (एनएमआरडीए) मा महानगर आयुक्त श्री जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम निर्मूलन मोहीम राबवण्यात आली यामध्ये नाशिक व त्रंबकेश्वर दोन्ही तालुक्यात एकाच वेळेला सुरुवात करण्यात आली
नाशिक तालुक्यातून बेळगाव ढगापासून सुरुवात करण्यात आली यामध्ये एनएमआरडीए तहसीलदार सुचिता चव्हाण, नाशिक ग्रामीण तहसीलदार पंकज पवार, टाऊन प्लॅनर श्री दिव्यांक सोनवणे ,श्री सागर इकडे, असिस्टंट टाऊन प्लॅनर सौरभ पाटील, नरेश पाटील ,पल्लवी हडपे हे होते. सकाळी लोक जास्त जमाव असल्याने दुपारी तीन नंतर खऱ्या कामाला सुरुवात झाली बेळगाव ढगांमधून एकूण अंदाजे 55 स्ट्रक्चर पाडण्यात आले
त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये टाऊन प्लॅनर अथर्व खैरनार उपविभागीय अधिकारी पवन दत्ता साहेब तहसीलदार गणेश जाधव, असिस्टंट टाऊन प्लॅनर किशोर काकडे अमोल पवार , शिवानी वामन व पोलीस पथकासह सुरुवात करण्यात आली अंजनेरी मधून एकूण अंदाजे 150, अनधिकृत स्ट्रक्चर पाडण्यात आले,
यामध्ये निवासी बांधकामांना कोणतीही हानी करण्यात आलेली नाही. केवळ वाणिज्य प्रयोजनाचे अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली, अशी माहिती तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी दिली आहे.