नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाकुंभ 2025 निमित्त तीन टपाल तिकीटांसह एक स्मरणार्थ स्मरणिका पत्रक जारी करताना टपाल विभागाला अभिमान वाटत आहे. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्राचे विकासमंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते प्रयागराज येथील अरैल घाट पोस्ट ऑफिस येथे तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
महाकुंभ 2025 च्या समृद्ध परंपरेचा सन्मान करत, पवित्र स्नानाच्या दिवशी विशेष कव्हर आणि लिफाफ्याचे, ‘दिव्य, भव्य आणि डिजिटल महाकुंभ’ आणि ‘प्रख्यात प्रयागराज’ चे वैभव साजरे करणारे एक चित्र पोस्टकार्ड यासह इतर भेटवस्तूंचेही प्रकाशन करण्यात आले. ही टपाल तिकिटे महाकुंभाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करतात.
कुंभमेळ्याचे मूळ हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथातील समुद्रमंथन (समुद्र मंथन) कथेनुसार, देव (सुर) आणि राक्षस (असुर) यांच्यात अमृत प्राप्तीसाठी (अमरत्व) युद्ध झाले. आकाशात झालेल्या युद्धादरम्यान, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक – या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले – जिथे आता कुंभमेळा आयोजित केला जातो, प्रयागराज येथे दर 144 वर्षांनी एकदा महाकुंभ होतो. त्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
स्मरणिका पत्रकात जारी केलेली तीन टपाल तिकिटे खालील श्लोकातून प्रेरित आहेत:
त्रिवेणीं माधवं सोमं भरद्वाजं च वासुकिम्।
वन्दे अक्षयवटं शेष प्रयागं तीर्थनायकम।
सांख सामंत यांनी रचना केलेले स्मारक टपाल तिकीट, महर्षी भारद्वाज आश्रम, स्नान आणि अक्षयवट या त्रिवेणी तीर्थाच्या तीन प्रमुख पैलूंचे सुंदर चित्रण करतात. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे, फर्स्ट डे कव्हर्स आणि ब्रोशरची मर्यादित आवृत्ती संकलित करा.