नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आतापर्यंत संतांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहे. यापुढे कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असेही पंतप्रधानांनी सांगितले.
हरिद्वारमध्ये अगोदरच निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाडयांनी १७ एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता इतर आखाडे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. हरिद्वारमध्ये होणारा कुंभमेळा हा ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. ३० एप्रिलला तिसरे शाहीस्नान होणार आहे. १३ आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषद याबाबत अंतिम निर्णय काय घेते हे महत्वाचे असणार आहे. पण या दोन आखाड्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतरहीआखाडे कुंभसमाप्तीची घोषणा करतील असे बोलले जात आहे.
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि जी से आज फोन पर बात की। सभी संतों के स्वास्थ्य का हाल जाना। सभी संतगण प्रशासन को हर प्रकार का सहयोग कर रहे हैं। मैंने इसके लिए संत जगत का आभार व्यक्त किया।
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021