त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ३१ आँक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहन होईल. तर २४ जुलै २०२८ ला ध्वजावतरण होणार आहे. त्याचप्रमाणे शाहीस्नानच्या या तारखा आहे.
प्रथम शाहीस्नान- आषाढ वद्य अमावस्या, सोमवार, दि. २ आगस्ट २०२७ रोजी.
द्वितिय शाहीस्नान- श्रावण वद्य अमावस्या, मंगळवार, दि. ३१ आगस्ट २०२७ रोजी.
तृतीय शाहीस्नान – भाद्रपद शुध्द द्वादशी, रविवार, दि. १२ सप्टेबर २०२७ रोजी संपन्न होईल.
श्रावण शुध्द तृतीया- सोमवार, दि. २४ जुलै २०२८ रोजी कुंभमेळा समाप्ती अर्थात कुंभमेळा ध्वजावतरण संपन्न होईल.