हरिद्वार (उत्तराखंड) – दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचे दुसरे शाहीस्नान आज (१२ एप्रिल) संपन्न झाले. पहाटेपासून साधू व भक्तांनी गंगेच्या किनारी शाहीस्नानासाठी मोधी गर्दी केली होती. देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना हे शाहीस्नान होणार का आणि झाले तरी ते कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, साधू व भाविकांनी शाहीस्नानासाठी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. तसेच, कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी झाले.
बघा शाहीस्नानाचा हा व्हिडिओ
#WATCH | Sadhus of Juna Akhara take second 'shahi snan' at Har ki Pauri ghat in Haridwar, Uttarakhand pic.twitter.com/ALqFQHH2nO
— ANI (@ANI) April 12, 2021