शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतमालातील कीटकनाशक अंश शोधणाऱ्या संशोधनास पेटंट; KTHM च्या प्राध्यापकांचे यश

जून 4, 2022 | 3:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220604 WA0001 e1654335868841

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिकाच्या कीड-रोग नियंत्रणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय शेतमाल निर्यात करताना मानवी आरोग्याची बाब गांभीर्याने घेत सध्या ‘किमान रेसिड्यू मर्यादा’ महत्वपूर्ण मानली जाते. त्यासाठी विविध चाचण्या केल्या जातात. त्याअनुषंगाने नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील प्रा.डॉ.विक्रम काकुळते, मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा.वैशाली अर्जुन टिळे व प्रा.अमृता उत्तमराव जाधव यांच्या ‘पेस्टींसाईड डिटेक्टिग प्लेट’ हे उपकरण तयार केले आहे. या संशोधनाला हे पेटंट मिळाले आहे.

धान्य, फळे व भाजीपाला उत्पादनात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र त्यापैकी काही कीटकनाशकांची कमाल मर्यादा मानवी आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे आयात व निर्यात प्रक्रियेत मालाची तपासणी काटेकोरपणे होत असते. जर शेतमालामध्ये कीटकनाशकांची कमाल पातळी आढळल्यास शेतमाल नाकारला जातो. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे या संशोधनाचा शेतकरी,आयाय निर्यात विभाग, कोल्ड स्टोरेज उद्योजक आदींना त्याचा फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘कीटकनाशके’ या संज्ञेत कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, उंदीरनाशके, मॉलसाईड्स, सूत्रकृमीनाशक, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अशा विविध प्रकारच्या संयुगांचा समावेश होतो. मानवी आरोग्याचा विचार करून त्यांच्याकडे लक्ष दिले जाते.मात्र कृषी उत्पादकता वाढ, कीड-रोग नियंत्रण, पीकसंरक्षण तसेच लागवड संवर्धन यासाठी वापर वाढता आहे. मात्र सध्या होणारा अतिरिक्त वापर हा मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहचवीत आहे,तर दुसरीकडे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकांमधील काही विषारी घटक मानवी आरोग्यावर गंभीर परिणामांशी संबंधित आहेत. असे हानिकारक घटक तपासणे हा या संशोधनाचा मुख्य गाभा आहे.

अशी होते तपासणी:
धान्य, फळे व भाजीपाला यामधील हानिकारक घटकांची माहिती अवगत होणार आहे. त्यामध्ये हानिकारक घटक आहेत की नाही हे ओळखण्यासाठी उपकरणातील प्लेटमध्ये एक थर समाविष्ट आहे. त्यामुळे शेतमाल खाण्यास योग्य आहे का? आणि असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण मानवी जीवनास हानी पोहोचवू शकते,हे त्यातून स्पष्ट होते. याद्वारे कीटकनाशकाचा कोणताही प्रकार ओळखल्यानंतर थराचा रंग बदलतो आणि ते वापरण्याचे धोके सांगण्यासाठी एलईडी दिवे वापरून संकेत प्राप्त होतात. या संशोधनामुळे महाविद्यालयाच्या संशोधन कार्यात व मानांकनात भर पडली आहे, या शब्दात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी कौतुक केले आहे. संशोधकांचा सत्कार संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ.सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक मंडळ,शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे, डॉ.एस.जे.कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.

ऑरगानोक्लोरीन,ऑर्गेनोफॉस्फरस,कार्बोमेट्स आणि पायरेथ्रॉइड्ससारखी कीटकनाशके शोधण्यासाठी अनेक विशिष्ट आणि विशिष्ट नसलेल्या क्रोमोजेनिक अभिकर्मकांचा वापर केला जातो.त्यामध्ये उच्च संवेदनशीलता आणि सुधारित निवडकता लक्षात येण्यासाठी अनेक क्रोमोजेनिक अभिकर्मक सादर केले गेले आहेत.क्रोमॅटोग्रामच्या स्वरूपात कीटकनाशकांसह अभिकर्मकाच्या अभिक्रियामुळे रंग तयार होतो. डिफेनिलामाइन, ऑर्गेनोमेटलिक अभिकर्मक,सोडियम नायट्रोप्रसाइड,ओ टोलुडिओडाइन , पोटॅशियम आयोडाइड यांसारखे अभिकर्मक वापरले गेले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावी नंतर करिअरची निवड कशी करावी? (बघा हा व्हिडिओ)

Next Post

गोविंदनगर, कर्मयोगीनगरमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20220604 WA0219 e1654336555226

गोविंदनगर, कर्मयोगीनगरमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011