लासलगाव – नाशिक जिल्ह्यात सतरा कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यापैकी सटाणा नामपूर उमराणा या तीन बाजार समिती वगळता १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला तीन महिने मुदतवाढ या शासनाच्या आदेशाने जाहीर झाली आहे. राज्यातील संपलेल्या निवडणूक कार्यक्रम सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाला शासनाने आज एक अध्यादेश काढून दिनांक २३ जानेवारी २०२२ पासून पुढील तीन महिन्यापर्यंत किंवा निवडणुकीनंतर संचालक मंडळ सत्तारूढ होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले असून या आदेशामुळे लासलगावसह पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या विद्यमान संचालक मंडळाला कार्यक्रम जाहीर झाला असला नसला तरी तीन महिने मुदतवाढ मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्यात सतरा कृषी उत्पन्न बाजार समिती असून त्यापैकी सटाणा नामपूर उमराणा या तीन बाजार समिती वगळता १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला तीन महिने मुदतवाढ या शासनाच्या आदेशाने जाहीर झाली आहे