इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) स्पर्धा” जाहीर करण्यात आली असून राज्यातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार, शेतकरी, लेखक, डिझायनर व उद्योजक अशा सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
या स्पर्धेमार्फत कृषी विभागाच्या दृश्य ओळखीचा भाग ठरणाऱ्या नव्या बोधचिन्ह आणि प्रेरणादायी घोषवाक्याची निवड करण्यात येणार आहे. कोणतेही प्रवेश शुल्क नसलेल्या या स्पर्धेत एकाच स्पर्धकास दोन पर्याय सादर करता येतील तसेच तो दोन्ही श्रेणींमध्ये (लोगो आणि टॅगलाईन) सहभाग घेऊ शकतो.
स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत:
बोधचिन्ह (Logo) – प्रथम पारितोषिक ₹1,00,000 तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे
घोषवाक्य (Tagline) – प्रथम पारितोषिक ₹50,000 तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:
स्पर्धकांनी आपले प्रस्ताव ई-मेलद्वारे [email protected] या पत्त्यावर पाठवावेत.
स्पर्धेची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे.
अटी, पात्रता व सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे: www.krishi.maharashtra.gov.in
शंका समाधानासाठी संपर्क:
📞 020-25537865
📧 [email protected]
शासनामार्फत कृषी विभागाच्या कार्याची दृश्यरूपात प्रभावी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांची सर्जनशील कल्पकता सादर करण्याचे हे उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.