बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात सुरु झाले ३०० बेडचे कोविड केअर सेंटर

by India Darpan
मे 7, 2021 | 8:35 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0003

– ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

– उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळेल दिलासा- छगन भुजबळ

नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था संघटनांनी पुढे यायला हवे असे आवाहन आपण करत असून त्यादृष्टीने नाशिकमधील डाॅ .विजय पवार, डाॅ. स्वप्निल इंगळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या अनुभवातुन ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरच्या निर्मिती केली आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील अतिशय उत्तम कोविड सेंटर नाशिकमध्ये उपलब्ध झाले झाले असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन दिलासा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक शहरात मुंबई नाका परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, हंसराज वडघुले, हॉस्पिटलचे संचालक डाॅ .विजय पवार, डाॅ. स्वप्निल इंगळे, नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भंडारी यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटर या अतिशय चांगल्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अत्यंत कमी वेळात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करण्यास वाहून घेणारे हॉस्पिटल आहे. जो पर्यंत कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर कोरोना विरुद्ध लढा देण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कोरोनाने मोठयाप्रमाणात हातपाय पसरविण्यास प्रारंभ केल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यास अनेक मदतीचे हात पुढे आलेत. अनेकांनी विविध मार्गाने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यात डाॅ. पवार आणि डाॅ. इंगळे ३०० बेड्सचे सेंटर उभारून कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

IMG 20210507 WA0004

रुग्णांना मिळणार या सुविधा…

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असतांना त्या तुलनेत बेड्स अपुरे पडत असल्याचे आणि अनेकांना त्यामुळे प्राणही गमवावे लागल्याचें निदर्शनास आल्यानंतर रुग्णांना दिलासा देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल आणि वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईनाका परिसरात उत्तर महाराष्ट्रातील सर्व  सुविधायुक्त असे भव्य ३०० बेड्सचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. एक लाख २० हजार चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेच्या बांधकामात साकारलेल्या  या कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात १०० बेड्सचा लोकार्पण आज करण्यात आले आहे.

या हॉस्पिटलमध्ये  ३५ आयसीयू  तर ६५ ओटू बेड  असतील. दुसऱ्या टप्प्यात रुग्णांसाठी आणखी २०० बेड्स उपलब्ध होणार असून यात ६५ आयसीयू तर १३५ ओटू बेड्स असतील. तसेच या कोविड केअर सेंटरमध्ये १५ व्हेंटिलेटर, ६० बायपॅप तसेच २५ ओटू माॅनिटर उपलब्ध असणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना चाचणीसाठी रिलायन्सने घेतला हा मोठा निर्णय; चाचण्यांचा वेग वाढणार

Next Post

नाशिक – केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेस पावणे बारा लाखांचा गंडा

India Darpan

Next Post
cyber crime

नाशिक - केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने महिलेस पावणे बारा लाखांचा गंडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011