कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील नद्या, नाले सारेच दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच नगर-मनमाड रोडवरील पुलही पाण्यात बुडाला आहे. असे असतानाही या पुलावरुन अतिशय धोकादायत पद्धतीने वाहतूक सुरू असल्याची बाब निदर्शनास येत आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वच प्रवासी वाहनांमध्ये मोठी गर्दी आहे. प्रवाशांनी भरलेली वाहने या पाण्याने भरलेल्या पुलावरुन नेली जात आहेत. याठिकाणी दुर्घटना होण्याचीही भीती आहे. याची तत्काळ दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
बघा येथील सद्यस्थितीचा हा व्हिडिओ
Kopargaon Very Heavy Rainfall Bridge Dangerous Traffic