अजय सोनवणे, मनमाड
कोपरगाव – प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांनी कोपरगाव बेट येथील गुरु शुक्राचार्य यांच्या मंदीरास भेट देऊन दर्शन घेतले. दैत्य गुरु म्हणून ओळखल्या जाणा-या गुरु शुक्रार्चायांचे कोपरगाव बेटावरील हे एकमेव मंदीर आहे. येथे अनेक जण दर्शनासाठी येत असतात. काल सोमवती आमवस्येचा दिवस असल्याने अनुराधा पौडवाल यांनी मंदीरात येऊन नवग्रह व शुक्र शांती पूजा पाठ केला. कोपरगाव येथील वेदमुर्ती सागर.संदेश खुळगे,संजय जोशी यांनी यावेळी पौराहित्य केले. मंदीराचे पुजारी नरेंद्र जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. तर मंदीराचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. अनुराधा पौडवाल यांना पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी मंदीर परिसरात गर्दी केली होती.