कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीन वर्षापूर्वी कोरोना काळात राज्यातील सर्व मठ मंदिरे बंद ठेवण्यात आली होती, त्यानंतर हळूहळू सर्व मंदिरे खुली होऊन पुन्हा एकदा दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली, काही ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाता येत नव्हते. बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते. मात्र आता बहुतांश मंदिरांमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची सोय उपलब्ध झाली असताना कोल्हापूर येथील अंबाबाई तथा महालक्ष्मीच्या मंदिरात मात्र गाभाऱ्यात जाऊन दर्शनाची सुविधा उपलब्ध नव्हती मात्र आता यासंदर्भात निर्णय झाला असून भाविकांना अंबाबाईच्या मूर्ती समोर नतमस्तक होऊन दर्शन घेता येणार आहे.
ओटीही भरता येणार
साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन २९ ऑगस्टपासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. तसेच देवीची ओटी देखील भरता येणार आहे.
श्रावणामुळे प्रचंड गर्दी
कोरोना काळापासून कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गाभाऱ्यात दर्शन सुरू करावे, अशी मागणी भाविकांकडून होत होती. कोल्हापूरच्या अंबाबई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे. सुट्टीच्या दिवशी तर मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल असते. सध्या श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या दोन ते अडीच महिन्यांनी उघडून मोजणी केली जाते. मंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात. कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे.
kolapur Darshan Ambabai Religious
Kolhapur Mahalaxmi Ambabai Temple Darshan Trust Devotees