कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारत देशातील पहिला सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर, रेडिओ ॲमॅचुअर क्लब कोल्हापूर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, IEEE संस्था अमेरिका यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेला तंत्रज्ञानावर आधारित भूर्प्रवण भागासाठी गुणकारी संदेश यंत्रणेच्या प्रकल्पाचे आज जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर प्रवणतेचा विचार करून पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा ही संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते.
या यंत्रणेचा वापर करणाऱ्या या हौशी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीच्या कालावधीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण सुरू राहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील पूरबाधित होणारी गावे आंबेवाडी व चिखली या तिन्ही ना हम रेडियो तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचं काम या प्रकल्पाने केलेला आहे.
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारांनी करण्यात आलेला अशा स्वरूपाचा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये तसेच दुरुस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पूरबाधित भागाशी व्यत्यविरहित संदेश देवाण-घेवाण सातत्याने करता येणार आहे लोकांचे स्थलांतर काही लोक अडकले असतील तर त्यांची सुटका शोध व बचाव इत्यादी सर्व कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री प्रसाद संकपाळ यांनी प्रकल्पाविषयीची माहिती मान्यवरांना विशद केली माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हित कापून तसेच या यंत्रणेचा वापर करून या दोन गावांमध्ये संदेश देवाण-घेवाण करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण तसेच छत्रपती मालोजीराजे इत्यादी मांडणीवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हॅम रेडिओ मेंबर श्री नितीन ऐनापुरे यांच्या विशेष प्रयत्नांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा पतदर्शी प्रकल्प करणे शक्य झाले आहे श्री नितीन आनापुरे या प्रकल्पाचे केअरटेकर म्हणून यापुढे काम करणार आहेत.
Kolhapur Ham Radio Service Started