कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यातील सत्ता बदलानंतर व अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे, यासाठी मागणीचा रेटा वाढला असून या संदर्भात आता पुन्हा एकदा आंदोलने सुरू झाली आहेत. त्यातच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मराठा आरक्षणाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना त्यांच्या समोरच काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
यांच्यात झाली बाचाबाची
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र विविध संस्थेत वेगवेगळे उपक्रम सुरू असतानाच आज कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचे लक्षात आले. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली. अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण केले. त्यानंतर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी त्यांनी थेट विचारणा केली. ही बैठक कोल्हापुरातील समाजासाठी आहे की, राज्यातील मराठा समाजासाठी आहे.
अजित पवारांचे आवाहन
मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणी लावून धरली होती. त्यासोबतच आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी देखील मागणी केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, इतकेच नव्हे तर टेबलवर हात आटपून आरडाओरडा सुरू केली. यावेळी अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस पुढे आल्यानंतर मग योगेश केदार व कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. त्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांना मग खुद्द अजित पवार म्हणाले की, मी जागा सोडलीय का? असा प्रश्न विचारला. या गोंधळामुळे व वादामुळे बैठकीचे वातावरण चांगलंच तापले होते, सर्वच कार्यकर्त्यांना आता नेमके काय करावे हे सूचेना. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मराठा समाजाच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही पण मराठा समाजाला मदत होईल, याबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, असे ते म्हणाले.
Kolhapur DYCM Ajit Pawar Meet Activist Protest
Maratha Reservation