कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुली, तरुणी आणि महिला यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यातील अन्य प्रांतातही असे प्रकार सरासपणे घडत आहेत. गुंडगिरी करीत तरुणींची छेड काढणाऱ्या तीन टार्गट पोरांना जमावाने चांगलाच धडा शिकवला. कोल्हापूर मध्ये हा प्रकार घडला.
शाहू मैदान बस स्टॉप परिसरात काही मुली बसने प्रवास करत असताना तीन तरुण बसस्टॉप जवळ उभे होते. येथे उभे राहून ते सतत येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत होते. या रोजच्या त्रासाला मुली कंटाळून रडकुंडीला आल्या होत्या. शाळेत जाणाऱ्या मुलींची ही टार्गट मुले रस्त्यात उभे राहून नेहमीच छेड काढत असत, त्या मुली मात्र याकडे दुर्लक्ष करून भीतीने घरी जात होत्या, त्यानंतर त्यांनी पुन्हा तीन तरुणांनी शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढली. अशा प्रकारे ही वाईट घटना घडल्यानंतर छेड काढणाऱ्या तिन्ही आरोपींना जमावाने चांगलाच चोप दिला.
संतापाची लाट
कोल्हापूर शहर शांतता प्रेमी आहे, परंतु येथे कुस्तीगीर देखील राहतात. कुस्तीगीर रोज आखाडयात तालीम करतात, तसेच अन्यायाविरुद्ध ते नेहमीच आवाज उठवतात. त्यातच सध्या विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांना आणि मुलींना त्रास देणाऱ्याला आपणच धडा शिकवला पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात आहेत. अशात अखेर कोल्हापूरातील या सडकसख्याहरी म्हणजेच रोडरोमीओंना चांगलीच अद्दल घडवली. विशेषतः भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला आहे. बस स्टॉपवरील मुलींनी देखील संबंधित तरुणांना चप्पलेचा मार दिला. छेड काढणाऱ्या तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली तेव्हा भररत्यात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी मग या संधीचा फायदा घेतो आपला हात साफ करून घेतला आणि त्या तरुणांनी चोप देण्यात ते देखील सामील झाले , तर काही जणांनी मग या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉडींग देखील केले आहे.
kolhapur crime mob beaten girl molestation youths teasing