कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यापासून काही फायदा असला तरी तोटे देखील खूप दिसून येतात, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत असल्याचेही निदर्शनास येते. विशेषतः कोणी अनोळखी महिला व पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात येतात आणि त्यामध्ये मैत्रिणी निर्माण होते परंतु मैत्रीचे रूपांतर एखाद्या वेगळ्याच नात्यात होते, तेव्हा त्यातून मग काहीतरी गैरप्रकार घडतात आणि गुन्हेगारी देखील वाढते, असे दिसून येतो. कोल्हापूर शहरातही असाच एक भयानक प्रकार घडला. येथे एका हनीट्रॅप प्रकरण घडून आले आहे.
फोनवर अश्लील बोलणे
एक इसम आपल्याला ओळखीतून फोनवर अश्लील बोलून फोटो व्हायरल करण्याची धमकी देतो, म्हणून एका महिलेने त्याचा काटा काढण्यासाठी रचलेल्या हनीट्रॅपचा चांगला भांडाफोड झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. अटकेतील महिलेनेच हनीट्रॅप रचल्याचे समोर आले आहे. याबाबतची फिर्याद किरण पाटील (रा. जठारवाडी ता.करवीर) याने दिली होती. कोमल आणि फिर्यादी किरण पाटीलची पूर्वीपासून ओळख होती. किरण हा कोमलशी अश्लील बोलत होता. तसेच माझ्याकडे तुझे फोटो आहेत असे म्हणत ते व्हायरल करण्याची धमकी तिला देत होता. त्यामुळे कोमलने किरणचा काटा काढण्यासाठी संबंधित माहिती आपला दीर इंद्रजितला दिली. इंद्रजितने मित्र नितीन, मोहसिम आणि करण यांना दिली. इंद्रजितने शुभांगी नावाने सुरु केलेल्या फेक अकाऊंटवरुन किरणशी चॅटिंग सुरु केले. किरणला सुद्धा ही महिला शुभांगी असल्याचे वाटले. त्यामुळे भेटण्यासाठी गेल्यानंतर किरणशी झटापट करुन मारहाण केली. तसेच मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये सुद्धा घेतले.
तपासात पोलीसही चक्रावले…
याप्रकरणी किरण पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अधिक तपास करून अखेर कोमल पाटील (वय २९ रा. आकर्डे ता. पन्हाळा, इंद्रजित पाटील (वय २८ रा. आकुर्डे ता. पन्हाळा, नितीन पाटील, (वय ३२, रा.कोपार्डे ता. करवीर, मोहसिम चाँदसाब मुल्ला (वय २४, रा. कोपार्डे ता. करवीर, करण रेणुके, (वय २३ रा. कोपार्डे ता. करवीर) यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेला माल, मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये रोख रक्कम तसेच दोन मोटरसायकलीसह एकूण १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
भेटायला बोलवले
यापुर्वी फिर्यादी किरण उत्तम पाटीलने इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेली शुभांगी नावाच्या मैत्रिणीला बालिंगा पाडळीमधील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी किरणसोबत झटापट करुन, त्याचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून घेत पळून गेले. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या. संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी किरणच्या मोबाईलवर शुभांगी नावाची महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत होती, असे आढळून आले. एकंदरीत या गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे पोलीसही चक्राहून गेले होते.