कोल्पापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -कोल्हापुरातल्या उचगावमध्ये टेम्पोचालक अजित संधे आणि त्यांच्या कुटुंबियांशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. आज कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी ते आले होते. सकाळी पावणे दहाच्या वाजता ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. तेथून त्यांनी थेट हॅाटेलवर न जाता उचगावकडे आपला ताफा वळवला. डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या कौलारु घरी ते अगोदर गेले. ही भेट जवळपास अर्धा तास होती. त्यांनी या वेळात कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या किचनमध्ये जात अल्पोपहार केला.
या भेटीबाबत अजित संधे यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलतांना सांगितले की, खरं तर, आम्ही त्यांच्यासमोर कधी उभेही राहू शकत नाही. मात्र अशा व्यक्तीने आमच्या कुटुंबाला अचानक भेट दिली. स्वयंपाक घरात येऊन अल्पोहार केला. त्यांनी आम्हाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
राहुल गांधी ठिकठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात. त्यांच्याशी ते संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतात. आज महाराष्ट्रात ते आल्यानंतर त्यांनी पुन्हा टेम्पोचालकाची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीचा महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडिायवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुनाची… पर्वा बी कुनाची…