गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पवारांच्या या डावाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का….

by India Darpan
सप्टेंबर 4, 2024 | 12:57 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 8

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे समरजितसिंह घाटगे यांचा पक्षप्रेवश सोहळा संपन्न झाला. हा प्रवेश सोहळा म्हणजे पवारांच्या या डावाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेला मोठा धक्का समजला जातो. घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्वीय मानले जाणारे होते. त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यावी लागली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधाक कागल विधानसभा मतदार संघातून शरद पवार यांनी आजच घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली.

या सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. राजे समरजितसिंह घाटगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो. शरद पवार आज स्वतः उपस्थित आहेत हा संदेश कागल विधानसभेला पुरेसा आहे. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कागलच्या इतिहासाची नव्याने सुरुवात होत आहे.

शरद पवार साहेब हे कसे जमवतात या विचाराने आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील. पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखू ठेवलेला असतो. बरेच लोकं पक्ष सोडून गेले. पण लक्षात ठेवा “जहां पे हम खडे होते हैं, लाईन वहि से शुरू होती हैं.” मी आधीही सांगत होतो पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका, कपाळ मोक्ष ठरलेलं आहे. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात जाऊन फक्त काही काळापुरते संरक्षण मिळते.

राजे समरजितसिंह यांनी गेली १० वर्षे अविरतपणे कार्य केले. कारखाना अतिशय आदर्शपणे चावलेला आहे. सत्ता असो वा नसो कार्यरत राहण्याचा बाणा त्यांनी स्वाभिमानाने जपला आहे. ते व्यवसायाने सीए आहेत. विरोधकांची वजाबाकी त्यांना व्यवस्थितपणे करता येते. हिशोब चोख ठेवणारे राजे समरजितसिंह मतदारसंघात विकास घडवतील हा मला विश्वास आहे.

ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. इतके सुमार काम करणारा शिल्पकार अद्याप फरार आहे. तो नक्की कोणाचा मित्र आहे? भ्रष्टचाराने परिसीमा गाठली आहे.

छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटले नाही असा कांगावा करत आहेत. कारण गुजरातचे नाव काढले की सत्ताधारी घाबरत आहेत. त्यामुळेच महराजांचा इतिहास बदलण्याचे पाप करत आहेत.

बहुजन समजाच्या विचारांचे राज्य येण्यासाठी पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत आहे. आपला पक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांना तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुतणीस पळवून लावण्याचा संशय…तिघांनी रिक्षाचालकावर केला चॉपरने हल्ला

Next Post

नाशिक शहरात विनयभंगाच्या दोन घटना…पोलिसांनी केली ही कारवाई

India Darpan

Next Post
rape

नाशिक शहरात विनयभंगाच्या दोन घटना…पोलिसांनी केली ही कारवाई

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011