शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापूर येथे घेतले श्री अंबाबाईचे दर्शन…

by India Darpan
सप्टेंबर 2, 2024 | 7:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
1 6 1140x570 1 e1725285443884

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.

श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी…१८ हजार कोटी प्रकल्पाचा खर्च

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकराचे घेतले दर्शन…केली ही प्रार्थना

Next Post
11

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकराचे घेतले दर्शन…केली ही प्रार्थना

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011