कोल्हापूर – पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आललेे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज कोल्हापूर येथे शाहुपुरीत अचानक भेट झाली. या भेटीत दोघांनी पूरपरिस्थितीबाबत चर्चाही करत काही वेळ संवाद साधला. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. तसेच या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची सुद्धा गरज असल्याने एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सुद्धा केली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते असे म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1421007151296745474?s=20