मुंबई – पूरस्थीतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सकाळी कोकण दौ-यावर निघाले आहे. या दौ-याचे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत असल्याचे म्हटले आहे.
कालच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तळीये येथील दौरा करुन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत धीर दिला. त्यानंतर आता राणे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे ते केंद्राकडून कोणती मदत या दुर्घटनाग्रस्तांना करतात व त्यांना धीर देतात हे महत्त्वाचे असणार आहे.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1419153609166528513?s=20
https://twitter.com/MeNarayanRane/status/1419135602063073283?s=20