मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नव्या घरात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी ते कृष्णकुंज येथे राहत होते. आजपासून ते शिवतीर्थ येथे राहणार आहेत. राज यांची नवी वास्तू शिवतीर्थ नक्की कसे आहे, याची अनेकांना उत्सुकता आहे. याचसंदर्भात ज्येष्ठ मनसैनिक आणि राज यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली आहे.
असे आहे राज यांचे शिवतीर्थ
– राज ठाकरे यांची जीवनशैली, स्वभाव आणि आवड-निवडी याचे परिपूर्ण प्रतिबिंब शिवतीर्थमध्ये आहे.
– घरामध्ये ठिकठिकाणी भिंतींवर अतिशय सुबक पेंटींग्ज लावण्यात आले आहेत.
– घराचा तळमजला हा पक्ष कार्यालयासाठी राखीव आहे. तेथे बैठक कक्ष, राज यांची स्वतंत्र केबिन, अभ्यागतांसाठी स्वतंत्र कक्ष, पत्रकार परिषदेसाठी कक्ष आदींचा समावेश आहे.
– शिवतीर्थमध्ये सुसज्ज असे वाचनालय आहे. राज यांना वाचनाची आवड असल्याने मराठी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तके आहेत.
– शिवतीर्थ हे एकूण सहा मजली आहे.
– सर्वात वरच्या मजल्यावर अत्याधुनिक जीम साकारण्यात आली आहे.
– पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आणि प्रशस्त असा डायनिंग हॉल आहे.
– राज ठाकरे हे शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी आणि चित्रपटांचे प्रचंड चाहते आहेत. त्यामुळे शिवतीर्थमध्ये अत्याधुनिक असे होम थिएटर आहे.
– घराचा दर्शनी भाग हा शिवाजी पार्कच्या दिशेने आहे त्यामुळेच घराचे नाव शिवतीर्थ ठेवण्यात आले आहे.
– नव्या घराचे फर्निचर हे देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातून आणण्यात आले आहे.
– राज ठाकरे हे कलाकार असल्याने त्यांनी घराच्या संपूर्ण निर्मितीत विशेष रस घेतला.
– राज यांनी त्यांच्या आवडत्या विविध वस्तू घरासाठी विविध ठिकाणाहून आणल्या आहेत.
– घराचे इंटेरिअर हे संपूर्णपणे राज यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.
– राज, त्यांच्या मातोश्री, अमित या सर्वांची बेडरुम आणि अन्य खोल्याही हवेशीर आहेत.